मनपा अभियंत्यास अवैध नळधारकारने बदडले ; गुन्हा दाखल

Foto
अनधिकृत नळकनेक्शन तोडणाऱ्या  मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंत्यास  अब्रार कॉलोनी येथे मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फुरखान उर्फ बाबू (रा.अब्रार कॉलोनी) असे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नाव आहे.

मनपा पाणी पुरवठा विभागातील झोन क्रमांक ६,७,८  चे प्रभारी कनिष्ठ अभियंता नवनाथ वामनराव वीर वय ५३ (रा.काल्डा कॉर्नर) यांनी अवैध नळ कनेक्शन  तोडल्याच्या कारणावरून आरोपी बाबू याने त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहह्याक फौजदार राठोड करीत आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker